पिरतीची कीरत dept.
पिरतीची कीरत समद्याहुनी लई न्यारी ।।
ही पिरत जडली रामाला, शीतेसाटी यडा परभू जाला ।
मग पुसं झाडापाखराला, कुनी दावा पिरत माझी प्यारी ।।
हीनं जनीला यडं क्येलं, हीनं नाम्याला घायळ क्येलं ।
हीनं तुक्याचं मन भारलं, सार्या सृष्टीत रमले नर-नारी ।।
अशी झळंबी कितीका बिजली, कितीकांची जीवजोत इजली ।
पर जीचावर मती हिची रिझली, त्यानं साधिल्या मुक्ती चारी ।।
पिरतीची कीरत समद्याहुनी लई न्यारी ।।
- कवी गिरीश.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment